Saturday, June 13, 2009

नवे शुद्र!

सामाजिक नयाय हा सधया परचलित असलेला परवलीचा शबद आहे. सगळे राजकारण याच शबदाभोवती फिरत असते. परतयेक राजकीय पकषाचे घोषणापतर सामाजिक नयायाचे आशवासन दिलयाखेरीज पूरणतवास जात नाही. जाती'या उतरंडीत पिचलेलया या समाजातील काही जातींचे कायमच शोषण झाले, तयांचे नयायय हकक कायमच नाकारलया गेले आणि तयामुळे इतर पुढारलेलया जातीं'या तुलनेत या जाती मागास राहिलया, ही बाब नाकारणयात अरथ नाही. या जातींना विकासाची समान संधी मिळायला हवी आणि तयासाठी कायदयात काही विशिषट तरतुदी करायला हवयात, ही बाबही समरथनीय आहे; परंतु तयाचवेळी एका ठिकाणचा खडडा बुजविताना दुस:या ठिकाणी खडडा तयार होणार नाही, याचीही दकषता घेतलया गेली पाहिजे. सामाजिक नयाया'या आंदोलनाचे आजचे सवरूप पाहता ही दकषता घेतली जात आहे असे महणणे थोडे धाडसाचेच ठरेल. खरेतर सामाजिक नयायाचा पाया सामानयांना नयाय हाच असायला हवा आणि या सामानय लोकांचा कोणतयाही जाती'या कुंपणात बंदिसत करून विचार होता कामा नये. पुढारलेलयां'या शोषण वयवसथेत भरडलया जाणारा सामानय माणूस परतयेक जातीत असतो. तयामुळे सामाजिक नयायाची संकलपना अधिक विसतृत होऊन ती सामानयांना नयाय अशी होणे अपेकषित आहे. तसे झाले नाही तर शोषक आणि शोषित यां'या केवळ भूमिका बदललया जातील, वयवसथा तीच कायम राहिल. शिकषणा'या कषेतराचा विचार केला तर आपलयाला दिसून येते की पूरवी शिकषणा'या हककाचा थेट संबंध जातीशी होता. उ'चवरणीय जातींनाचा शिकषणाचा अधिकार असायचा, तातपरयाने तयाच जातींना विकासाची संधी उपलबध वहायची. सुरूवातीला महातमा फुलयांनी या पकषपाती वयवसथेला सुरूंग लावणयाचा परयतन केला. तयांना काही परमाणात यश देखील आले; परंतु सगळयात महततवाचे महणजे तयांनी ठिणगी चेतवली. तयाच ठिणगीचा पुढे वडवानल झाला आणि शिकषणातील काही जातींची एकाधिकारशाही संपुषटात आली. महातमा फुलयां'या काळातील आवहान वेगळे होते आणि तयांनी तसेच तयां'या परंपरेतील लोकांनी ते तयां'या पदघतीने मोडीत काढणयाचा परयतन केला. आज आवहान वेगळे आहे. आज शिकषणाचा किंवा उ'चशिक्षणाचा अधिकार जाती'या आधारावर नाकारलया जात नाही. आता हा अधिकार आरथिक आधारावर निशचित होतो. पूरवी शुद्र हे संबोधन जातीगत होते, आता नवे शुद्र जनमाला येत आहेत आणि तयांचा संबंध तयां'या आरथिक परिसथितीशी आहे. खासगी अथवा सरकारी नोक:यांमधील, विविध कंपनयां'या उ'च पदांवरील जागांची संखया तुलनेत अतिशय कमी असते. पूरवी या जागांसाठी फारशी सपरधा नसायची कारण या जागांंवर पोहचणयासाठी लागणारी शैकषणिक पातरता परापत करणा:यांचे परमाणच कमी असायचे; परंतु आता शिकषणाची दारे सगळयांसाठी खुली असलयाने सपरधा वाढली आहे. पूरवी शिकषणापासून चार हात लांबच राहणा:या बहुजन समाजातील मुलेही आता या उ'चपदां'या सपरधेत आवहान उभी करीत आहेत. हे आव्हान तसे मोडीत काढणे शकय नाही, हे लकषात आलयावर आता उ'चशिकषणातील आणि परयायाने उ'चपदांवरील आपला अधिकार सुरकषित ठेवण्यासाठी समाजातील उ'चभू्र वरगाने नवी शककल लढविली आहे. सरकारलाच हाताशी धरून या वरगाने समांतर शिकषण वयवसथा खासगी शाळां'या माधयमातून उभी केली आहे. तयातूनच ठिकठिकाणी कॉनवहेंट वगैरेंचे पीक फोफावले आहे. ब:याच ठिकाणी निवासी वयवसथा असलेलया आणि शिकषणा'या अतयाधूनिक सुविधा असलेलया मोठ मोठया शाळा उभया केलया आहेत. डेहराडून, नाशिक, पुणे, लोणावळा, पाचगणी इथलया अशा शाळांचा एकूण आवाका पाहिला तर आपण भारतात आहोत की एखादया युरोपियन देशात असा परशन पडतो. एक ते तीन लाख परयंत वार्षिक शुलक आकारणा:या या शाळा महणजे शिकषणा'या बाजारपेठेतील चकचकीत मॉलसच महणायला हवयात. या मॉलसमधये सामानय गराहकांना परवेशच नसतो. 'यां'या खिशात भरपूर पैसा आहे, अशाच पालकांची मुले या शाळांमधये दाखल होतात. या शाळांमधील शिकषण आणि सरवसामानयांसाठी असलेलया सरकारी शाळांमधील शिकषणाची तुलनाच होऊ शकत नाही. सवाभाविकच जेवहा उ'चशिकषणासाठी सपरधेचा परशन निरमाण होतो तेवहा सरकारी शाळांमध्ये शिकलेली सरवसामानयांची मुले आपोआपच मागे पडतात. नुकतेच बारावीचे निकाल जाहीर झाले. या परीकषेतील गुणवंतां'या नावावरून थोडी नजर फिरवली तरी हा फरक आपलया सहज लकषात येईल. जवळपास ऐंशी टकके गुणवंत आरथिक परिसथिती अतिशय चांगली असलेलया घरचे आहेत. याचाच अरथ आता आरथिक आधारावर नवे शुदर आमही निरमाण करीत आहोत. जेवहा हा आधार जातीगत होता तेवहाही समाजातील ऐंशी टकके लोकांना शिकषणाचा अधिकार नवहता आणि आताही समाजातील ऐंशी टकके लोकांना उ'चशिकषण नाकारले जात आहे. पराथमिक शिकषण मातर सगळयांनाच उपलबध आहे, कारण पराथमिक शिकषणाची सोय सरकारतरफे केली जाते. तयामुळे या शिकषणासाठी फारसा खरच येत नाही. दहावी-बारावी परयंत मुले सहज शिकू शकतात; त्यापुढे मातर पैसेवालयांचे अघोषित आरकषण सुरू होते. एरवी सामाजिक नयाया'या नावाने कंठशोष करणा:या राजकीय नेतयांचाही याला मोठा हातभार आहे. तयां'या महाविदयालयातच भरपूर देणगी दिलयाशिवाय परवेश मिळत नाही. त्याचवेळी इतर खासगी शाळां'या तुलनेत सरकारी शाळांमधये मिळत असलेले पराथमिक आणि माधयमिक शिकषण इतके सुमार दरजाचे असते की या शाळांमधून दहावी-बारावी झालेली मुले बौद्घिकदृषट्याही खूप मागे पडतात. याचा परिणाम हा होतो की या देशाचे कोट्यवधीचे मनुष्यबळ केवळ मजुरी किंवा इतर निम्न दर्जाची कामे करण्यात वाया जाते. बियाणे उततम दरजाचे असूनही केवळ पडिक किंवा बंजर जमिनीत पडल्यामुळे न अंकुरताच कोमेजून जाते. ही परिसथिती लक्षात घेऊन सरकारने आता शिकषणा'या कषेतरातील पैशाचा धुडगूस ताबडतोब थांबविणे गरजेचे आहे. त्यासोबतच इतर कुठलयाही खासगी शाळां'या तुलनेत त्याच दरजाचे शिकषण आणि इतर सुविधा सरकारी शाळांमधयेही उपलबध करून देणे सरकारची जबाबदारी आहे. सगळ्यांना पराथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यावरच सरकारची जबाबदारी संपत नाही तर हे शिकषण दरजेदार आणि आधुनिक काळाशी सुसंगत कसे असेल, याचीही काळजी सरकारने घयायला हवी. उ'चशिकषणासाठी एक पैसाही या विद्याथ्र्याला सवत:'या खिशातून खर्च करावा लागणार नाही, ही काळजी देखील सरकारने घ्यावी. तसे झाले नाही तर उ'चशिक्षण ही केवळ पैसेवाल्यांची मत्ते*दारी होईल आणि शैक्षणिक विकासातली दरी पूर्वीसारखीच कायम राहिल. शुद्र पूर्वीही होते, शुद्र आताही आहेत; फरक पडला तो एवढाच की पूर्वी शुद्रां'या काही जाती होत्या आता सर्वच जातीत शुद्र जन्माला येत आहेत. कारण गरीबी सर्वच जातीत आहे आणि नव्या व्यवस्थेत गरीबी हा शुद्र असण्याचा मुख्य आधार होऊ पाहत आहे.

Monday, June 1, 2009

तुला सलाम!

कासदराची सरकारी आकडेवारी काहीही सांगत असली तरी सध्या देश प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. या सरकारच्या नीतीचा हा परिणाम आहे किंवा अलीकडील काळातील काही निर्णय चुकीचे झाल्याने ही समस्या उद्भवली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या लोकांनी देशाचा कारभार सांभाळला तेव्हापासूनच सगळे काही चुकत गेले, त्या चुकांच्या मालिकेचा परिणाम आता समोर येत आहे. प्रधानमंत्री किंवा अर्थमंत्री विकासदराची जी काही आकडेवारी लोकांसमोर ठेवत आहेत, त्या विकासदराचा देशातील ९० टक्के लोकांशी काहीही संबंध नाही. विकासाचा हा झगमगाट केवळ पाच-दहा टक्के लोकांपुरताच मर्यादित आहे. बकिच्यांच्या घरात दारिद्र्याचा अंधारच आहे. गेली शेकडो वर्षे शेती आणि शेतकरी हाच या देशाच्या अर्थकारणाचा आधार होता. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात या महत्त्वाच्या घटकाकडेच अक्षम्य दुर्लक्ष झाले. अमेरिकी भांडवलशाहीला डोळ्यासमोर ठेवून नेहरूंनी केवळ मोठमोठ्या उद्योगांच्या उभारणीला प्राधान्य दिले, मोठमोठी धरणे बांधण्यात आली. अर्थात हे धोरण चुकीचे होते असे म्हणता येणार नाही, परंतु उद्योगांचा हा डोलारा ज्या पायावर उभा राहणार होता, त्या पायाकडेच दुर्लक्ष करण्यात आले. चीनमधील सांस्कृतिक क्रांती आणि भारताचे स्वातंत्र्य या दोन्ही घटना जवळपास एकाच कालावधीतील आहेत. दोन्ही देशांत एकाचवेळी सत्तांतर झाले. परंतु आर्थिक प्रगतीचा विचार करता त्यानंतरच्या दोन्ही देशांच्या प्रवासात खूप मोठी तफावत पडत गेली. सुरुवातीच्या काळात चीनच्या अर्थव्यवस्थेची फारशी चर्चा झाली नाही. साम्यवादाच्या पोलादी पडद्याआड लपलेला एक सर्वाधिक लोकसंख्येचा देश हीच या काळात चीनची ओळख होती. परंतु गेल्या वीस वर्षांत चीनच्या आर्थिक प्रगतीने अचानक वेग घेतला आणि तो इतका प्रचंड होता की अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्रही हादरून गेले. चिनी उत्पादनांनी जगाची बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली. आज चीन एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. चीनची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत अतिशय मजबूत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा कडव्या साम्यवादी चीनने जागतिक व्यापारात उडी घेत भांडवलशाहीचा मार्ग अनुसरला. हे सगळे अचानक झाले नाही. जगाच्या अर्थकारणावर आपली छाप उमटवण्यापूर्वी चिनी राज्यकर्त्यांनी आधी उद्योगासाठी पूरक अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. आज रस्ते, वीज, पाणी आदी कशाच्याच बाबतीत चीनमध्ये ओरड नाही. या पायाभूत सुविधा भक्कमपणे उभ्या केल्यानंतर चीनने उद्योगांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा कौशल्याने वापर करीत स्वस्त आणि दर्जेदार उत्पादनांची निर्मिती होऊ लागली. इतरांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेला हाताशी धरण्याइतपत चतुरपणा चीनने दाखवला. त्याचवेळी देशी उत्पादनांना विदेशी उत्पादक कंपन्यांकडून आव्हान मिळणार नाही याचीही दक्षता घेतली. आपण यापैकी काहीही केले नाही. कारखाने उभे केले, धरणे बांधली म्हणजे औद्योगिक विकास झाला, हीच आपली धारणा राहिली. परिणामी काही वर्षांनंतर उभे झालेले उद्योग माना टाकू लागले. विजेचा प्रश्न निर्माण झाला, दळणवळणाचा प्रश्न आधीपासूनच होता तो तसाच कायम राहिला. देशातील सगळ्या मोठ्या धरणांची पाणी साठवण क्षमता गाळामुळे अर्ध्यावर आली. पिण्यासाठीच पाणी मिळेनासे झाले तिथे सिंचनासाठी, उद्योगासाठी पाणी कुठून मिळणार? या सगळ्या ढिसाळ कारभाराचा परिणाम आज पाहायला मिळत आहे. महागाई गगनाला भिडली आहे. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झालीच आहे, परंतु इतर वस्तुंच्या तुलनेत ती कमीच म्हणावी लागेल. सिमेंट, लोखंडाचे भाव प्रचंड वाढले आहेत. जमिनीचे भाव सर्वसामान्यांच्या नव्हे तर श्रीमंताच्याही आवाक्यापलीकडे गेले आहेत. विजेसाठी कितीही पैसा मोजायला उद्योजक तयार आहेत, परंतु वीजच नाही. या परिस्थितीतही लहान-मोठे उद्योजक आपला धंदा चालू ठेवण्याचा, टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सरकारचा भक्कम आधार पाठीशी नसल्याने त्यांची धडपड व्यर्थ ठरू पाहत आहे. बेरोजगारीचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. सरकार किती लोकांना नौकरी देणार? अशावेळी लोकांच्या हातांना काम देणार्या लहान-मोठ्या उद्योगांच्या पाठीशी सरकारने उभे राहायला हवे, परंतु सरकारचे एकूण धोरण बघता देशी उद्योगांना टाळे लावण्याचा निर्धार सरकारने केला असावा, असेच चित्र दिसते. इतर देशांत उद्योजकांचे केवळ स्वागतच केले जात नाही तर प्रसंगी नुकसान सोसून सरकार त्यांना शक्य तितक्या सवलती, सुविधा उपलब्ध करून देते. मेक्सिकोत उद्योग उभा करणार्या धारीवाल यांचे उदाहरण मागच्या एका लेखात मी दिलेच आहे. आपल्याकडे त्याच्या अगदी विपरीत स्थिती आहे. सरकार कुठली मदत तर करीत नाहीच उलट सरकारकडून येणे असलेल्या अनुदानासाठी, कर परताव्यासाठी कोण मारामार करावी लागते. कर वसूल करण्याबाबत सरकार जेवढी तत्परता दाखवते, तेवढी आपल्यावरील जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दाखवत नाही. विदेशी कंपन्यांचे मात्र अगदी 'रेड कार्पेट' स्वागत असते. त्यांना सगळ्या सोयी, सवलती खळखळ न करता पुरविल्या जातात. देशी उद्योगांचे मरण आणि विदेशी कंपन्यांचे पोषण, हेच सरकारचे धोरण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सरकारला 'कंपनी सरकार' म्हटले जाते, ते काही खोटे नाही. वास्तविक स्वातंत्र्यानंतरच्या काळात ज्या जुन्या उद्योजकांनी कर भरून देशा'या विकासाला पैसा उपलब्ध करून दिला त्या कंपन्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सरकारने त्यांना बाकायदा पत्र देऊन, आजपर्यंत तुम्ही देशाची खूप सेवा केली, त्याची उतराई म्हणून यानंतर तुम्ही सरकारला कोणताही कर देऊ नका, अशी विनंती करायला हवी. त्या उद्योगांना करमुक्त करायला हवे. परंतु सरकार त्यांच्या छातीवरून उठायला तयार नाही. सरकारने जे काही जुने असेल ते मोडीत काढण्याचाच निर्धार केलेला दिसतो. जुन्या चित्रपटगृहांना कुठलीही सवलत नाही, करमणूक कराच्या छळातून त्यांना मुक्ती नाही, साधा बांधकामात बदल करायचा असेल तर परवानगी नाही, तिकीट दर ठरवण्याचा अधिकार नाही, परंतु नव्या 'मल्टिफ्लेक्स'ला मात्र वाट्टेल त्या सवलती. जुन्या करांच्या भडिमाराने उद्योग मरत नाही म्हटल्यावर सरकारने नवे नवे कर शोधून काढले, त्यातूनही कुणी वाचत असेल तर ऊर्जापुरवठा बाधित करून त्याचा अंत पाहणे सुरू केले. सांगायचे तात्पर्य आम्ही ना धड शेतीला न्याय देऊ शकलो, ना धड उद्योगांना. कायमच्या दुर्लक्षामुळे शेती कोलमडून पडली आणि दिशाहीन नियोजनामुळे उद्योगांचे तीन-तेरा वाजले. त्याचा परिणाम आज दिसून येत आहे. अशाही विपरीत परिस्थितीत लोक जगत आहेत, संघर्ष करीत आहेत, आपली शेती, आपला उद्योग फुलविण्याचा प्रयत्न करीत आहेत, चार लोकांच्या हातांना काम मिळावे, चार लोकांची पोटे भरावी यासाठी धडपडत आहेत आणि त्यांच्या या जिद्दीमुळेच या देशाचे आर्थिक स्वातंत्र्य अद्याप टिकून आहे. अन्यथा साध्या टाचणीसाठी आपल्याला विदेशी कंपन्यांचे मोहताज राहावे लागले असते. त्यांच्या या जिद्दीला सलाम करावाच लागेल!

Sunday, May 3, 2009

आजकाल सगळीकडे `ग्लोबल वार्मिंगची' चर्चा होत असते.

आजकाल सगळीकडे `ग्लोबल वार्मिंग'ची चर्चा होत असते. या वर्षीच्या उन्हाच्या तडाख्याने तर या चर्चेला थोडी अधिकच धार चढली आहे. `ग्लोबल वार्मिंग'चा प्रश्न नक्कीच गंभीर आहे; परंतु हे `ग्लोबल वार्मिंग' केवळ भूगोलाशी किंवा पृथ्वीच्या तापमानाशी संबंधित नाही. या `ग्लोबल वार्मिंग'ला इतरही अनेक आयाम आहेत. प्रदूषण ही केवळ भौतिक बाब राहिलेली नाही. प्रदूषण आता सामाजिक, शारीरिक आणि मानसिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत आहे. धोका केवळ पर्यावरणालाच नाही, तर मानवी सभ्यतेलाही निर्माण झाला आहे. थोडे बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येईल की अलीकडील काळात वैयक्तिक आणि कौटुंबिक हिंसाचारात खूप वाढ झालेली आहे. हिंसाचार पूर्वीही होता; परंतु बहुधा तो लढाई वगैरेच्या माध्यमातून व्हायचा. देशाच्या किंवा धर्माच्या रक्षणासाठी माणसे तलवार हाती घ्यायची. आता लढाया वगैरे फारशा होत नसल्या तरी माणसे तितकीच मारली जातात, रक्त तितकेच सांडते आणि याला कारण आहे ती दिवसेंदिवस क्रूर, हिंसक बनत चाललेली मानवी वृत्ती. ही वृत्ती आता अधिकाधिक बळावत चालली आहे. माणसांमधला सोशिकपणा, साहचर्याची भावना, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती हळूहळू लोप पावत चालली आहे. कोणाचे डोके केव्हा भडकेल आणि कोण कुणाचा मुडदा पाडेल सांगता येत नाही. भावांना भाऊ, सासवांना सुना, सुनांना सासवा, पोरांना आपले म्हातारे आई-बाप शत्रूसारखे वाटायला लागले आहेत. लोकांच्या वृत्तीत होत असलेला हा बदल स्वाभाविक प्रक्रियेचा भाग नाही. हा बदल घडवून आणल्या जात आहे किंवा हा बदल घडण्याजोगी परिस्थिती निर्माण केली जात आहे. आपण जसा आहार घेतो तसे आपले शरीर बनते, तसेच आपल्यासमोर जे विचार मांडले जातात त्यानुसार आपली मनोवृत्ती घडत जाते. सकारात्मक विचार असतील तर परिणाम सकारात्मकच मिळतील. साधे उदाहरण आहे, एखादा लहान मुलगा कप-बशी घेऊन जात असेल आणि आपण त्याला म्हटले की पहा फोडशील, तर नक्कीच ती कप-बशी फुटणार. एरवी ती त्याने व्यवस्थित नेली असती, परंतु आपल्या हाताने ती फुटू शकते, हा नकारार्थी विचार त्याच्या मनात शिरताच नकारार्थी प्रेरणा मिळून तसा परिणाम होतो. त्याऐवजी त्याला केवळ सांभाळून ने एवढे म्हटले तरी तो ती तशीच व्यवस्थित घेऊन जाईल. सकारात्मक विचारांचे महत्त्व खूप आहे. विजेचा दिवा शोधून काढणारया एडिसनला हा शोध यशस्वी करण्यासाठी हजारवेळा प्रयत्न करावे लागले होते. हजाराव्या प्रयत्नात तो शेवटी यशस्वी ठरला आणि त्यासाठी आपण एक दिवस यशस्वी होऊच हा सकारात्मक विचारच कारणीभूत ठरला. मी हे करू शकणार नाही, मला हे जमणार नाही, हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे, असा विचार करणारा माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. एक गोष्ट समजून घ्यायला हवी की प्रत्येक प्रयत्न यशस्वी होत नसला तरी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. मी स्वत: नेहमीच सकारात्मक विचार करतो आणि आज मी जे काही आहे ते या विचारांच्या ऊर्जेमुळेच. सांगायचे तात्पर्य सुदृढ, निकोप आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. दुर्दैवाने आज जे विचार विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत ते कमालीचे नकारात्मक आणि विषाक्त आहेत. या वैचारिक प्रदूषणासाठी सर्वाधिक जबाबदार आहे तो `इडियट बॉक्स' अर्थात छोटा पडदा! या छोट्या पडद्यामुळे आपले सामाजिक स्वास्थ्यच धोक्यात आले आहे. एकतर आजकाल माणसाचे जगणे खूप धावपळीचे झाले आहे. विरंगुळ्यासाठी त्याच्याजवळ फारसा वेळ नसतो. पूर्वी थोडा निवांतपणा असायचा. त्यामुळे चांगल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे वाचन व्हायचे. त्यातून चांगले विचार मिळायचे. आता या छोट्या पडद्याच्या अतिक्रमणाने तर वाचन संस्कृतीच नष्ट होऊ घातली आहे. विरंगुळ्याचे चार क्षण टीव्हीसमोर बसून घालविणारया माणसाच्या डोक्याचे पार खोबरे करण्याचे काम या टीव्हीवरच्या मालिका करीत आहेत. विशेषत: तुलनेत अधिक वेळ टीव्हीसमोर घालविणारया महिलांचा बुद्घिभेद करण्याचे काम इमानेइतबारे हा छोटा पडदा करीत आहे. अशी एकही मालिका नसेल की ज्यात कट-कारस्थाने, हिंसा, एकमेकांचा द्वेष, विवाहबाह्य संबंध आदींची रेलचेल नसेल. शिवाय हे इतक्या प्रभावीपणे दाखविले जाते की त्यात काही गैर आहे, असेही हे पाहणारया लोकांना विशेषत: महिलांना वाटत नाही. त्या मालिकांमधील पात्रांपैकी एखाद्या पात्रात स्वत:ला शोधत त्या मालिकांशी समरस होणारया महिला वर्गाला आपण कोणते वैचारिक विष आपल्या डोक्यात ओतून घेत आहोत, याची कल्पनाही नसते. हे सगळे पात्र त्यांच्यासमोर आदर्श म्हणून उभे केले जातात. हे असे वैचारिक भरण असेल तर त्यातून सकारात्मक विचार निर्माण होतील तरी कसे? सासूला अनाथाश्रमाचा रस्ता दाखविणारी पडद्यावरची सून आदर्श वाटत असेल तर घरात तोच `सिन' दाट शक्यता असते. उरलीसुरली कसर भूताखेताच्या , पुनर्जन्मावर वगैरे आधारित मालिका भरून काढतात. हे असे भयंकर पोषण होत असेल तर त्या मेंदूत सकारात्मक आणि शुद्घ विचारांना जागा उरतेच कुठे? त्यातही आपले `टीआरपी' टिकवून ठेवण्यासाठी कथेला अनेक अतर्क्य वळणे दिली जातात. मेलेला माणूस पुन्हा जिवंत करणे किंवा पुनर्जन्म दाखवून तोच माणूस पुन्हा उभा करणे दिग्दर्शकाच्या डाव्या हातचा मळ असतो. हा पनाही अतर्क्यपनाही सहज खपवून घेतला जातो. आज छोट्या पडद्याने बहुतेकांचे भावविश्व व्यापून टाकले आहे, ही वस्तुस्थिती स्वीकारली तर हा छोटा पडदा करत असलेले वैचारिक प्रदूषण ही किती गंभीर समस्या आहे, याची कल्पना येऊ शकते. हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही. या विविध वाहिन्या आणि त्यांनी पोसलेले कार्यक्रम निर्माते, दिग्दर्शक केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी हे सगळे करत नसून त्यामागे एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या देशाची कुटुंबव्यवस्था, त्यातून होणारे संस्कार, त्या संस्कारातून निर्माण झालेली सामाजिक वीण उद्ध्वस्त करण्याचा हा कट असू शकतो. प्रत्येक मालिकेत जाणीवपूर्वक ज्या एरवी आपल्या कुटुंबात घडत नाहीत त्या गोष्टी ठासून आणि त्याला तात्त्विकतेचा मुलामा देऊन दाखविण्यात येतात. महिला वर्ग आणि तरुण पिढीवर तशा गोष्टींचा चटकन परिणाम होतो. आजकाल समाजात स्वैर आणि स्वछन्दपना वाढीस लागलेला दिसतो तो याचमुळे. कुटुंबात कलह निर्माण होण्यामागेही हेच वैचारिक विष कारणीभूत ठरत आहे. या प्रदूषणाला वेळीच आळा घालणे भाग आहे. युरोपमधल्या काही देशात टीव्ही न पाहण्याची चळवळच सुरू झाली आहे. अनेक संघटना लोकांना टीव्हीपासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करीत आहे . `से नो टू इडियट बॉक्स' असेच त्या चळवळीचे नाव आहे. आपल्याकडेही अशा प्रबोधनाची गरज आता निर्माण होऊ पाहत आहे. टीव्ही असो अथवा चित्रपट असो, या दोन्ही माध्यमातून नकारात्मक विचारांचा भडिमार सुरू असतो. `मी शिवाजी राजे भोसले बोलतोय'सारखा एखादाच चित्रपट त्याला अपवाद ठरावा, एरवी बाकी सगळ्या चित्रपटांनी आणि छोट्या पडद्यावरील मालिकांनी त्यांच्या दर्शकांना अंतर्बाह्य पोखरण्याचेच पत घेतले आहे. मी अनेक वैद्यकीय त'ज्ञांशी याबाबतीत बोललो आहे आणि त्या सगळ्यांचेच म्हणणे असे होते की मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोगसारख्या विकारांचा थेट संबंध माणसाच्या मन:स्थितीशी असतो. एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करीत आनंदाने जगत असेल तर त्या व्यक्तीला हे विकार होण्याची शक्यता जवळपास शून्य असते; परंतु एखादी व्यक्ती नेहमीच नकारात्मक आणि हिंसक विचार करीत असेल तर त्या व्यक्तीची या विकारांपासून सुटका नाही. हे वैद्यकीय सत्य असेल तर अर्धा देश हृदयरोगी किंवा रक्तदाबाचा रुग्ण करण्याचे पुण्यकार्य छोटा आणि मोठा पडदा करीत आहे, असेच म्हणावे लागेल. लोकांच्या हातात `रिमोट' असतो, त्यांनी काय पाहायचे ते स्वत: ठरवावे असा एक तर्क नेहमीच दिला जातो; परंतु काहीही पाहिले तरी तेच दिसत असेल तर काय करायचे? आधी चटक लावायची, नंतर त्याचे व्यसन झाले की मग आम्ही थोडीच तुम्हाला हे पाहण्याचा आग्रह करतो अशी शहाजोगपणाची भूमिका घ्यायची, असा सगळा प्रकार आहे. जे चहाच्या बाबतीत झाले, जे क्रिकेटच्या बाबतीत झाले तेच आता या मालिका आणि चित्रपटांच्या बाबतीत झाले आहे. सरकार आणि समाजाने यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, एवढे नक्की!

Sunday, April 19, 2009

जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.


जीवनात तत्त्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्त्वं नसती आणि त्यांचे पालन करणारी माणसे नसती तर माणुसकी हा शब्दही कदाचित जन्माला आला नसता. दुर्दैवाने अलीकडच्या काळात तत्त्वांना अडगळीत टाकून स्वार्थ साधून घेणारया लोकांना खोटी का होईना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या खोट्या प्रतिष्ठेसाठी खुंटीवर टांगून ठेवल्या जाणारया तत्त्वांमध्ये निष्ठेचा क्रमांक बराच वरचा लागतो. विशेषत: राजकारणाच्या क्षेत्रात तर अलीकडे निष्ठेचे सारे संदर्भच बदलले आहेत. कोण आपली निष्ठा केव्हा कोणाच्या पायी अर्पण करेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही.प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ''कोणाच्याही निष्ठा दोघांच्या ठायी असू शकत नाहीत. प्रत्येक व्यक्ती एक तर एकाचा दुस्वास करेल अन् दुसरयावर प्रेम करेल किंवा ती एकाप्रती समर्पित असेल अन् दुसरयाचा तिरस्कार करेल. प्रभू येशू ख्रिस्तांनी हे विधान केले, तेव्हा भारतात लोकशाही प्रणालीचा जन्म व्हायचा होता. त्यांनी जर भारतातील आजचे राजकारण अनुभवले असते तर हे विधान नक्कीच केले नसते. कपडे बदलावे तेवढ्या सहजतेने निष्ठा बदलणारया माणसांची आज भारतीय राजकारणात अजिबात वाणवा नाही. अर्थात, निष्ठा बदलल्यास त्याचे फळ मिळत असल्यामुळे आणि त्या फळापोटी खोटी प्रतिष्ठा, मानमरातब, धनसंपत्ती लाभत असल्यानेच अशा लोकांचे अलीकडे मोठे पीक आले आहे. अशा लोकांना 'सूर्याजी पिसाळची अवलाद' या बिरुदाने हिणवल्या जाण्याचे दिवस तर केव्हाच मागे पडले, उलट आजकाल असे लोक इतरांचे आदर्श बनायला लागले आहेत.यावेळी नमनालाच निष्ठेचे घडाभर तेल जाळण्याचे कारण म्हणजे पंधराव्या लोकसभेची निवडणूक! विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत राजकारणात निष्ठेची कशी किंमत केली जाते, याची चुणूक दिसली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर निष्ठा बदलणारया हरिभाऊ राठोडांना निष्ठा बदलण्याचे बक्षीस मिळाले आहे, तर उत्तमराव पाटील यांच्यासारख्या निष्ठावंताला निष्ठावंत राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीसच्या रूपाने 'पुरस्कार' लाभला आहे! तिकडे भंडारा-गोंदिया मतदारसंघातही नाना पटोलेंसारख्या निष्ठावंत, संवेदनशील, मतदारांप्रती समर्पित नेत्याचाही पक्षातून निलंबित करून 'गौरव' करण्यात आला आहे!! पतिव्रतेला धोंडा अन् वेश्येला मणिहार, या मराठी भाषेतील म्हणीचे अशावेळी आपसुकच स्मरण होते. काय चुकले होते उत्तमराव दादांचे, की त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली? काय चुकले होते त्यांचे, की त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली? तब्बल सात वेळा यवतमाळ मतदारसंघातून निवडून येण्याएवढा जनाधार त्यांना प्राप्त होता, ही त्यांची चूक होती का? की त्यांनी उमेदवारी नाकारल्याबरोबर दुसरा घरठाव केला नाही, बंडखोरी केली नाही, ही चूक होती? की त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोडणारया यवतमाळ जिल्ह्यातील भागांत, त्या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचे काम सुरू केले होते, हा त्यांचा गुन्हा होता? एक माणूस ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय गणिते मांडून केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी तुमच्या पक्षात येतो अन् तो तुम्हाला तो एवढा गोड होतो की त्याला लगेच उमेदवारी मिळते! त्यासाठी तब्बल सहा वेळा त्या मतदारसंघातून निवडून येण्याचा भीमपराक्रम करणारया व्यक्तीला चक्क डावलल्या जाते!! हीच का निष्ठेची किंमत? आणि निवडणूक जवळ येताबरोबर तुमच्या पक्षाचा पुळका येणारया व्यक्तीची कर्तबगारी ती काय? तुमचे सरकार अडचणीत असताना तत्त्वं, निष्ठा खुंटीवर टांगून ठेवीत त्याने तुम्हाला मदत केली, हीच ना? आणि कशासाठी केली मदत? तुमच्या पक्षाबद्दल फार पुळका आला म्हणून? तुमच्या पक्षाची ध्येयधोरणे, तत्त्वं अचानक खूपच आवडायला लागली म्हणून? अजिबात नाही! त्यांनी निष्ठा बदलण्याचे एकमेव कारण हे होते, की मतदारसंघ फेररचनेच्या पृष्ठभूमीवर, ते आधी होते त्या पक्षात राहून त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधल्या गेला नसता. फेररचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मतदारसंघावर आपल्या पक्षाचा मित्रपक्ष दावा सांगणार आणि तो मान्य केला जाणार, याची राजकीय गृहीतके पक्की असलेल्या हरिभाऊ राठोडांना पूर्ण कल्पना आली होती आणि त्यामुळेच त्यांनी निष्ठा बदलली, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ सत्य आहे. उद्या काँग्रेसमध्ये आपला स्वार्थ साधल्या जात नाही याची खात्री झाल्यास ते आणखी तिसरा घरठाव करणार नाहीत, याची हमी ती काय? यवतमाळ-वाशिम मतदारसंघात जे उत्तमराव दादांसोबत काँग्रेसने केले, ते भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मित्रपक्षांनी एकत्रितरित्या केले. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराचे कुटुंब अवैध सावकारी करून शेतकर्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडीत असताना त्याच पक्षाचा दुसरा आमदार शेतकर्यांच्या प्रश्नावर चक्क आमदारकीला लाथ मारतो! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे घडले असते तर महाराजांनी नक्कीच हातातील कडे नाना पटोलेंच्या हातात घातले असते अन् ज्या मुद्द्यावर पटोलेंना राजीनामा द्यावा लागला, त्या मुद्द्यासंदर्भात दोषी असलेल्यांना कोडे मारले असते. आमचे दुर्दैव हे आहे, की ती शिवशाही होती अन् ही लोकशाही आहे. इथे शिवशाहीचा उपयोग केवळ निवडणुकीच्या प्रचारापुरता असतो, शिवजयंतीला मिरवणुका काढण्यापुरता असतो, दूरचित्रवाणीसाठी मालिका तयार करून किंवा चित्रपट काढून गल्ला जमविण्यापुरता असतो! वास्तविक पटोलेंच्या रूपाने शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण असलेला, अभ्यासू, निष्ठावंत नेता गमाविण्याऐवजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने थोडे समजदारीने घेतले तर भागले असते. नाना पटोलेंचा लाखांदूर विधानसभा मतदारसंघ फेररचनेत गडप झाला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरीकडे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची अद्याप तीन वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला असता किंवा तो काँग्रेसने मागून घेतला असता तर नाना पटोलेंचे सहज राजकीय पुनर्वसन करता आले असते. तसे झाल्यास इथे निष्ठेची हीच किंमत होते, हा संदेशही कार्यकर्त्यांमध्ये गेला नसता. उल्लेखनीय म्हणजे, ही समजदारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रामदास आठवले आणि डॉ. राजेंद्र गवई या रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांसाठी दाखवली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची जागा लढविलेले रामदास आठवले यावेळी काँग्रेसच्या वाट्याची जागा लढवित आहेत, तर काँग्रेसच्या वाट्याची जागा लढवित आलेल्या रा.सू. गवईंचे चिरंजीव असलेले डॉ. राजेंद्र गवईंनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याची जागा लढविली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मित्रपक्षांसाठी दाखविलेली हीच समजदारी दोनपैकी एका पक्षाच्या अभ्यासू नेत्यासाठी का दाखविता आली नाही? का त्याला बंडखोरी करण्यास भाग पाडण्यात आले आणि अखेर निलंबित करण्यात आले? अर्थात, हा विषय काही केवळ काँग्रेसपुरताच मर्यादित नाही. ही लागण सर्वच पक्षांना झाली आहे. उडदामाजी काय निवडावे काळे-गोरे, हाच प्रश्न आहे!उत्तमराव पाटील आणि नाना पटोले या दोघांच्या संदर्भात जे काही झाले त्याला आणखी एक कंगोरा आहे. पाटील आणि पटोले हे दोघेही बहुजन आहेत. कुणबी समाजाचे आहेत. (स्वत:ला मराठा, पाटील, देशमुख, पंचकुळी, शहाण्णव कुळी म्हणविणारे सर्वच कुणबी आहेत, ही माझी वैयक्तिक धारणा आहे, जी मी वेळोवेळी जाहीर केली आहे आणि त्या धारणेनुसारच मी येथे कुणबी हा शब्द वापरला आहे.) विदर्भात हा समाज बहुसंख्य आहे; मात्र दुर्दैवाने या समाजाचे नेतृत्व विभागलेले आहे. या समाजातील सारेच स्वत:ला सिंह समजतात आणि त्यामुळे इतर सर्वांनी माझी पाठराखण करावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. परिणामी संपूर्ण समाज विखुरलेला आहे आणि याची जाणीव असल्यामुळेच एवढ्या मोठ्या समाजातील दोघा शक्तिशाली नेत्यांना एकाच निवडणुकीत अशी वागणूक देण्याचे धारिष्ट्य केल्या जाते. पश्चिम महाराष्ट्रात अशी हिंमत दाखविता येत नाही; कारण तेथील कुणबी समाज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे. अर्थात त्यासाठी पवारांनीही तशी तपश्चर्या केली आहे. ते नेहमीच म्हणत असतात, ''मी पाच वर्षे काम करतो, म्हणून लोक निवडणुकीच्या काळात एक महिना माझे काम करतात. त्यांना निवडणुकीच्या काळात वैयक्तिकरित्या कधीच त्यांच्या मतदारसंघात ठाण मांडून बसावे लागत नाही; कारण त्यांचे काम बोलत असते. पश्चिम महाराष्ट्राने त्यांच्या नेतृत्वाखाली न भुतो, न भविष्यती असा विकास साधून घेतला आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून कधीकाळीच्या माळरानांवर त्यांनी विकासाची नंदनवने फुलविली आहेत. त्यामुळे त्यांचा असा दबदबा निर्माण झाला आहे, की ते कोणाचेही राजकीय आयुष्य घडवूही शकतात अन् बिघडवूही शकतात. त्या दबदब्यामुळे दिल्लीश्वरांना त्यांच्या मर्जीशिवाय पश्चिम महाराष्ट्रात एखाद्याचा 'नाना पटोले' किंवा 'उत्तमराव पाटील' करता येत नाही. विदर्भात असे जाणीवपूर्वक होऊ दिल्या गेले नाही; कारण पश्चिम महाराष्ट्रात एक शरद पवार निर्माण होताबरोबर दिल्लीश्वरांची त्या भागात मर्जी चालेनासी झाली. हे त्या भागात प्रथमच घडले असे नाही. साडेतीनशे वर्षांपूर्वी त्याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला अन् प्रथम विजापूरकरांची व नंतर दिल्लीश्वरांची मर्जी चालेनासी झाली. शिवाजी महाराजांपूर्वी त्या भागातील कुणबी समाजही सध्याच्या विदर्भातील कुणबी समाजाप्रमाणेच विखुरलेला होता. कोणी दिल्लीपतीच्या, कोणी विजापूरकरांच्या तर कोणी अहमदनगरकरांच्या चरणी निष्ठा वाहिलेल्या होत्या. त्यांच्या मनगटातील जोर अन् तळपत्या समशेरींच्या बळावर मोगल, आदिलशहा, निजामशहा आपापले बळ, प्रदेश, संपत्ती वाढवित होते आणि वेळ पडल्यास त्यांनाच हत्तीच्या पायी देत होते. जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना परक्यांऐवजी स्वकीयांशी एकनिष्ठ राहायला शिकवले तेव्हा त्यांनी त्याकाळी कोणी स्वप्रातही विचार केला नसेल, असे हिंदवी स्वराज्याचे स्वप्र साकारले. विदर्भातील कुणबी समाज या इतिहासापासून आता तरी काही धडा घेणार आहे काय? आता तरी थोडे आत्मचिंतन करणार आहे काय?

Wednesday, April 8, 2009

पेराल ते उगवणारच !


आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरूवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत.एका तत्त्ववेत्त्याने आपल्या आत्मकथेत लिहून ठेवले आहे की, मी प्रार्थना करणा:या, भक्ती करणा:या खूप लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या प्रार्थना काळजीपूर्वक ऐकल्या आणि मला याचे प्रचंड आश्चर्य वाटले की जवळपास सगळेच लोक देवाकडे दोन अधिक दोन पाच होऊ दे, सात होऊ दे किंवा अजून काही होऊ दे; परंतु दोन अधिक दोन चार होऊ देऊ नकोस, हीच मागणी करत होते. मला खूप आश्चर्य वाटले. देव असला म्हणून काय झाले, दोन अधिक दोन चारचा नियम त्यालाही बदलता येत नाही आणि लोकांची नेमकी तीच मागणी असायची. आपण जे काही केले किंवा करत आहोत त्याचेच फळ आपल्याला मिळणार, ही वस्तुस्थिती स्वीकारायला लोक तयारच नसतात. दोन अधिक दोनचा नियम त्यांना मान्य नसतो; परंतु साक्षात ईश्वरही हा नियम बदलू शकत नाही. तो तत्त्ववेत्ता होता म्हणून कदाचित हा प्रकार पाहून गोंधळला असेल. सर्वसामान्य माणसे अशी गोंधळात पडत नाहीत, कारण एवढा विचार ते करतच नाहीत. आपण काहीही केले तरी देव आपले भलेच करेल, यावर त्यांची गाढ श्रद्घा असते; परंतु असे कधीच होत नाही. जे पेरले जाईल तेच उगवेल आणि हा नियम सर्वव्यापी आहे. एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात जसा तो लागू आहे तसाच तो समाजाच्या आणि राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे. दुस:यासाठी खड्डा खोदताना आपण आपलीही कबर खोदत असतो. तसे पाहिले तर हा खूप सोपा नियम आहे, खूप साधा तर्क आहे; परंतु बरेचदा साध्या गोष्टीच आचरणात आणण्यासाठी अवघड असतात आणि त्यातूनच प्रचंड मोठ्या समस्या निर्माण होतात. हा साधा नियम लक्षात न घेतल्यानेच जगाचा इतिहास रक्तरंजित झालेला दिसून येतो. जो इतिहासापासून काही शिकत नाही त्याचे भविष्य अंध:कारमय असते, असे म्हटले जाते ते उगाच नाही. हे माहीत असूनही इतिहासाकडे सोईस्कर डोळेझाक केली जाते. आगीशी खेळ करायला लोकांना आवडते. दुस:याच्या घराला चूड लावण्यात विकृत आनंद त्यांना मिळतो; परंतु तीच आग एक दिवस आपलीही राखरांगोळी करेल, हे त्यांच्या लक्षात येत नाही. माणसाने आग पेटविण्याचे तंत्र अवगत केले खरे, परंतु प्रत्येक वेळी त्या आगीवर नियंत्रण ठेवणे त्याला शक्य होतेच असे नाही. सर्वभक्षी आगीपुढे मानवी प्रयत्न अनेकदा विवश झाल्याचे आपण पाहतच असतो. कोणत्याही शक्तिवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्या शक्तिची ताकद आणि आपली मर्यादा याची पूर्ण जाणीव असणे भाग असते. यापैकी एकाही घटकाच्या आकलनात चूक झाली तर सर्वनाश ठरलेला. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर हे अनुभवाने कैक वेळा सिद्घ झालेले सत्य आहे. दुर्दैव हे आहे की या सत्याची जाणीव असूनसुद्घा अनेकांना आगीशी खेळ करण्याचा मोह होतोच. त्यात बरेचदा आपल्याला त्रास झाला तरी चालेल, परंतु आपला शत्रू नामोहरम झाला पाहिजे ही सूडाची भावना असते. आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरुवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत. केवळ चटकेच नाहीतर अगदी होरपळणे आता सुरू झाले आहे. ज्या पद्घतीने आणि तंत्राने पूर्वी भारतावर आतंकी हल्ले होत असत आता त्याच पद्घतीने त्या देशातही आतंकी हल्ले होत आहेत. कदाचित अजूनही आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो हे सत्य त्या देशाला कळालेले नसेल; कदाचित आजही आतंकवाद्यांच्या भडक डोक्यात जिहादी विष पेरून भारताला नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे त्या देशात आखले जात असतील; परंतु एक दिवस आपण बाभळीचे बी पेरत आहोत त्यामुळे काटेरी झाडेच उगवत आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. तशी सुरुवात लाहोरपासून झालेलीच आहे. अर्थात एवढ्या धड्यावरून शहाणपण येण्याइतकी अक्कल त्या देशाकडे नाही आणि ज्या दिवशी ती येईल तोपर्यंत त्यांच्या हाती केवळ राख उरलेली असेल. आपला हात आपल्याच डोक्यावर ठेवून भस्मसात झालेल्या भस्मासुराच्या कहाणीचा 'रिमेक' एक दिवस होणे निश्चित आहे. आतंकवादाला कुठलीही वैचारिक बैठक असू शकत नाही, तसेच कोणतेही एक निश्चित ध्येय आतंकवादासमोर नसते. माणसे मारणे, दहशत निर्माण करणे आणि त्यातून विकृत आनंद मिळविणे, असलेच तर हेच आतंकवादाचे तत्त्वज्ञान आहे. आतंकवादाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी पोसणा:या आपल्या शेजा:यांना हे कधी कळणार? कदाचित आपली चूक आज त्यांच्या लक्षात येत असेलही, परंतु आता खूप उशीर झाला आहे. आम्हाला भारतातली माणसे मारू द्या आणि ते शक्य नसेल तर तुमची माणसे मारू द्या, असेच जणू काही या आतंकवाद्यांना म्हणायचे असेल. तसे नसते तर ज्या जिहादी विचारांनी त्यांची मस्तके पेटलेली आहेत त्याच जिहादी विचारांच्या जन्मभूमीला रक्तरंजित करण्याचे काही कारणच नव्हते. भारतावरील आतंकवादी हल्ल्यांसाठी काही तार्किक कारणे देता येतील; परंतु आपल्याच बापाच्या जिवावर उठलेल्या या आतंकवाद्यांचे लक्ष्य नेमके काय असू शकते? उत्तर वर म्हटल्याप्रमाणेच आहे. माणसात दडलेल्या हिंस्र जनावराला हिंसेचे एक विकृत आकर्षण असते. या आकर्षणाला धार्मिक विचारांचे खतपाणी घालून भारताविरुद्घ आग चेतविण्याचा खेळ आपल्या शेजा:यांनी केला. या खेळात भारताचे कदाचित काही नुकसान होईलही, परंतु हा खेळ सुरू करणा:या आपल्या शेजा:याची राखरांगोळी होणे निश्चित आहे. जगाच्या पाठीवर हिंसा पेरणा:या आपल्या शेजारी देशाचा त्याच हिंसेच्या आगीत बळी जाणे निश्चित आहे. शेवटी दोन आणि दोन यांची बेरीज चारच होत असते. सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्य या तिन्ही बाबी अतिशय तत्कालिक असतात. आज आहेत, उद्या असतील की नाही सांगता यायचे नाही. त्यामुळे त्यांचा अहंकार नसलेलाच बरा. श्रीकृष्णाच्या यादव कुळाला असाच सत्ता आणि सामर्थ्याचा माज चढला होता. त्याची परिणती ही झाली की शेवटी आपसात मारामा:या होऊन संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला. `यादवी' हा शब्द मराठीत रूढ झाला तो याच घटनेतून. सांगायचे तात्पर्य अतिरेक निसर्गाला मान्य नाही. निसर्ग नियमात ते बसत नाही; मग तो अतिरेक कशाचाही असो. आपण आज जे काही पेरत आहोत ते उद्या उगवणार आहे आणि कैकपटीने अधिक उगवणार आहे, याचे भान प्रत्येकाने राखले तर जगातल्या बहुतेक समस्यांचा निकाल लागेल; गोळ्या पेराल तर गोळ्याच खाव्या लागतील, दुस:याच्या अंगणात बारूद पेराल तर एक दिवस आपल्याही घरात स्फोट होईल. समजायला तशी ही खूप साधी गोष्ट आहे, परंतु दुर्दैवाने ही साधी गोष्टही लोकांच्या पचनी पडत नाही!

Tuesday, April 7, 2009

आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे.

एका तत्त्ववेत्त्याने आपल्या आत्मकथेत लिहून ठेवले आहे की, मी प्रार्थना करणा:या, भक्ती करणा:या खूप लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्या प्रार्थना काळजीपूर्वक ऐकल्या आणि मला याचे प्रचंड आश्चर्य वाटले की जवळपास सगळेच लोक देवाकडे दोन अधिक दोन पाच होऊ दे, सात होऊ दे किंवा अजून काही होऊ दे; परंतु दोन अधिक दोन चार होऊ देऊ नकोस, हीच मागणी करत होते. मला खूप आश्चर्य वाटले. देव असला म्हणून काय झाले, दोन अधिक दोन चारचा नियम त्यालाही बदलता येत नाही आणि लोकांची नेमकी तीच मागणी असायची. आपण जे काही केले किंवा करत आहोत त्याचेच फळ आपल्याला मिळणार, ही वस्तुस्थिती स्वीकारायला लोक तयारच नसतात. दोन अधिक दोनचा नियम त्यांना मान्य नसतो; परंतु साक्षात ईश्वरही हा नियम बदलू शकत नाही. तो तत्त्ववेत्ता होता म्हणून कदाचित हा प्रकार पाहून गोंधळला असेल. सर्वसामान्य माणसे अशी गोंधळात पडत नाहीत, कारण एवढा विचार ते करतच नाहीत. आपण काहीही केले तरी देव आपले भलेच करेल, यावर त्यांची गाढ श्रद्घा असते; परंतु असे कधीच होत नाही. जे पेरले जाईल तेच उगवेल आणि हा नियम सर्वव्यापी आहे. एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात जसा तो लागू आहे तसाच तो समाजाच्या आणि राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे. दुस:यासाठी खड्डा खोदताना आपण आपलीही कबर खोदत असतो. तसे पाहिले तर हा खूप सोपा नियम आहे, खूप साधा तर्क आहे; परंतु बरेचदा साध्या गोष्टीच आचरणात आणण्यासाठी अवघड असतात आणि त्यातूनच प्रचंड मोठ्या समस्या निर्माण होतात. हा साधा नियम लक्षात न घेतल्यानेच जगाचा इतिहास रक्तरंजीत झालेला दिसून येतो. जो इतिहासापासून काही शिकत नाही त्याचे भविष्य अंध:कारमय असते, असे म्हटले जाते ते उगाच नाही. हे माहीत असूनही इतिहासाकडे सोईस्कर डोळेझाक केली जाते. आगीशी खेळ करायला लोकांना आवडते. दुस:याच्या घराला चूड लावण्यात विकृत आनंद त्यांना मिळतो; परंतु तीच आग एक दिवस आपलीही राखरांगोळी करेल, हे त्यांच्या लक्षात येत नाही. माणसाने आग पेटविण्याचे तंत्र अवगत केले खरे, परंतु प्रत्येक वेळी त्या आगीवर नियंत्रण ठेवणे त्याला शक्य होतेच असे नाही. सर्वभक्षी आगीपुढे मानवी प्रयत्न अनेकदा विवश झाल्याचे आपण पाहतच असतो. कोणत्याही शक्तीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्या शक्तिची ताकद आणि आपली मर्यादा याची पूर्ण जाणीव असणे भाग असते. यापैकी एकाही घटकाच्या आकलनात चूक झाली तर सर्वनाश ठरलेला. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर हे अनुभवाने कैक वेळा सिद्घ झालेले सत्य आहे. दुर्दैव हे आहे की या सत्याची जाणीव असूनसुद्घा अनेकांना आगीशी खेळ करण्याचा मोह होतोच. त्यात बरेचदा आपल्याला त्रास झाला तरी चालेल, परंतु आपला शत्रू नामोहरम झाला पाहिजे ही सूडाची भावना असते. आपला शेजारी देशही असाच सूडाच्या भावनेने पेटलेला आहे. केवळ भारताला धडा शिकविण्यासाठी या शेजारी देशाने आतंकवादाच्या आगीचा खेळ करायला सुरुवात केली. एका मर्यादेपर्यंत त्यात तो देश सफलही झाला, परंतु आता त्या देशाने पेटविलेल्या आगीचे चटके त्यांनाच सहन करावे लागत आहेत. केवळ चटकेच नाहीतर अगदी होरपळणे आता सुरू झाले आहे. ज्या पद्घतीने आणि तंत्राने पूर्वी भारतावर आतंकी हल्ले होत असत आता त्याच पद्घतीने त्या देशातही आतंकी हल्ले होत आहेत. कदाचित अजूनही आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो हे सत्य त्या देशाला कळालेले नसेल; कदाचित आजही आतंकवाद्यांच्या भडक डोक्यात जिहादी विष पेरून भारताला नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे त्या देशात आखले जात असतील; परंतु एक दिवस आपण बाभळीचे बी पेरत आहोत त्यामुळे काटेरी झाडेच उगवत आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. तशी सुरुवात लाहोरपासून झालेलीच आहे. अर्थात एवढ्या धड्यावरून शहाणपण येण्याइतकी अक्कल त्या देशाकडे नाही आणि ज्या दिवशी ती येईल तोपर्यंत त्यांच्या हाती केवळ राख उरलेली असेल. आपला हात आपल्याच डोक्यावर ठेवून भस्मसात झालेल्या भस्मासुराच्या कहाणीचा 'रिमेक' एक दिवस होणे निश्चित आहे. आतंकवादाला कुठलीही वैचारिक बैठक असू शकत नाही, तसेच कोणतेही एक निश्चित ध्येय आतंकवादासमोर नसते. माणसे मारणे, दहशत निर्माण करणे आणि त्यातून विकृत आनंद मिळविणे, असलेच तर हेच आतंकवादाचे तत्त्वज्ञान आहे. आतंकवादाला आपल्या राजकीय स्वार्थासाठी पोसणा:या आपल्या शेजा:यांना हे कधी कळणार? कदाचित आपली चूक आज त्यांच्या लक्षात येत असेलही, परंतु आता खूप उशीर झाला आहे. आम्हाला भारतातली माणसे मारू द्या आणि ते शक्य नसेल तर तुमची माणसे मारू द्या, असेच जणू काही या आतंकवाद्यांना म्हणायचे असेल. तसे नसते तर ज्या जिहादी विचारांनी त्यांची मस्तके पेटलेली आहेत त्याच जिहादी विचारांच्या जन्मभूमीला रक्तरंजीत करण्याचे काही कारणच नव्हते. भारतावरील आतंकवादी हल्ल्यांसाठी काही तार्किक कारणे देता येतील; परंतु आपल्याच बापाच्या जिवावर उठलेल्या या आतंकवाद्यांचे लक्ष्य नेमके काय असू शकते? उत्तर वर म्हटल्याप्रमाणेच आहे. माणसात दडलेल्या हिंस्र जनावराला हिंसेचे एक विकृत आकर्षण असते. या आकर्षणाला धार्मिक विचारांचे खतपाणी घालून भारताविरुद्घ आग चेतविण्याचा खेळ आपल्या शेजा:यांनी केला. या खेळात भारताचे कदाचित काही नुकसान होईलही, परंतु हा खेळ सुरू करणा:या आपल्या शेजा:याची राखरांगोळी होणे निश्चित आहे. जगाच्या पाठीवर हिंसा पेरणा:या आपल्या शेजारी देशाचा त्याच हिंसेच्या आगीत बळी जाणे निश्चित आहे. शेवटी दोन आणि दोन यांची बेरीज चारच होत असते. सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्य या तिन्ही बाबी अतिशय तत्कालिक असतात. आज आहेत, उद्या असतील की नाही सांगता यायचे नाही. त्यामुळे त्यांचा अहंकार नसलेलाच बरा. श्रीकृष्णाच्या यादव कुळाला असाच सत्ता आणि सामर्थ्याचा माज चढला होता. त्याची परिणती ही झाली की शेवटी आपसात मारामा:या होऊन संपूर्ण यादव कुळाचा विनाश झाला. `यादवी' हा शब्द मराठीत रूढ झाला तो याच घटनेतून. सांगायचे तात्पर्य अतिरेक निसर्गाला मान्य नाही. निसर्ग नियमात ते बसत नाही; मग तो अतिरेक कशाचाही असो. आपण आज जे काही पेरत आहोत ते उद्या उगवणार आहे आणि कैकपटीने अधिक उगवणार आहे, याचे भान प्रत्येकाने राखले तर जगातल्या बहुतेक समस्यांचा निकाल लागेल; गोळ्या पेराल तर गोळ्याच खाव्या लागतील, दुस:याच्या अंगणात बारूद पेराल तर एक दिवस आपल्याही घरात स्फोट होईल. समजायला तशी ही खूप साधी गोष्ट आहे, परंतु दुर्दैवाने ही साधी गोष्टही लोकांच्या पचनी पडत नाही!

Wednesday, April 1, 2009

उत्साह हरवला !


खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
लोकसभा निवडणूक आता अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. बहुतेक सगळ्या पक्षांचे उमेदवार घोषित झाले आहेत. युत्या-आघाड्यांचे प्रश्न निकालात निघाले आहेत; परंतु निवडणुकीचा म्हणून जो एक `माहौल' असतो तो मात्र फारसा कुठे दिसत नाही. कदाचित आचारसंहितेसया बडग्यामुळे उमेदवार सावधपणे प्रचार करीत असावेत किंवा शेवटच्या दहा दिवसात सगळी कसर भरून काढण्याच्या योजना असाव्यात; परंतु निवडणुकीची एकूण रंगत कमी झाली आहे, हे निश्चित! त्यामागे सगळ्यात मोठे कारण मतदारांमधला निरूत्साह हेच आहे. लोकशाहीच्या या पंचवार्षिक तमाशाला लोक कंटाळले आहेत. निवडून कुणीही आले तरी `पहिले पाढे पंचावन्न' हीच परिस्थिती राहणार, हे लोकांना आता अनुभवाने कळायला लागले आहे. शिवाय राजकारणातील ध्येयवादाला सगळ्याच पक्षांनी मूठमाती दिल्यामुळे निवडीतल्या पयार्याबद्दल लोकांमध्ये उत्सूकताच उरली नाही. बेरोजगारी, भाववाढ, शेतक:यांच्या आत्महत्या, पायाभूत सुविधांची वानवा आणि जोडीला वाढता दहशतवाद या सगळ्या समस्या कुणीही निवडून आले, कोणत्याही पक्षाचे सरकार बनले तरी कायमच राहणार याची लोकांना जणू काही खात्री पटली आहे. तीच ती आश्वासने, त्याच त्या घोषणा, दारू जुनीच, पण बाटल्या नव्या या सगळ्या प्रकाराला लोक कंटाळले आहेत. खरेखुरे परिवर्तन घडविण्याची क्षमता कोणत्याही विद्यमान पक्षामध्ये, नेत्यामध्ये नाही, नव्या वाटा चोखाळण्याची धमक कुणी दाखवत नाही आणि कुणी तशी धमक दाखवत असेल तर इतर सगळे मिळून त्याची शिकार करतात, या सगळ्या पृष्ठभूमीवर लोकांमधला निरूत्साह वाढत असेल तर खरोखरच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. लोकांच्या या निरूत्सहामुळेच बडे राजकीय पक्ष आज गलितगात्र झाले आहेत. काँग्रेस, भाजप सारख्या राष्ट्रीय म्हणवून घेणा:या पक्षांना पाच-पन्नास प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांशिवाय धड उभेही राहता येत नाही. या पक्षांच्या मतदारांमध्ये सातत्याने घट होत असेल तर याचे कारण एकच आणि ते म्हणजे या पक्षांच्या विचारांमधले तात्त्विक अंतर कमी झाले आहे. विचारधारा फारशा वेगळ्या राहिल्या नाहीत, सत्तेसाठी कोणत्याही टोकाची तडजोड करण्याची तयारी या पक्षांनी दाखविण्यास सुरूवात केली आहे. निष्ठावान, ध्येयवादी कार्यकर्त्यांना पक्षात फारशी किंमत उरलेली नाही आणि मुख्य म्हणजे राजकारण किंवा निवडणूक आज पैशाचा खेळ झाली आहे. कोणत्याही पक्षाजवळ कोणतेही नवे मुद्दे नाहीत. विकासाची चर्चा कुणी करत नाही. फुकटात वीज किंवा तीन रूपयांत गहू-तांदूळ असल्या तद्दन भिकारचोट घोषणा देऊन मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्या जात आहे. खरेतर लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्राचा विकास याच मुद्यावर लढविल्या गेली पाहिजे; परंतु कोणत्याही पक्षाच्या प्रचारामध्ये या मुद्यांना स्थान नसते. एरवी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत शोभतील असे मुद्दे लोकसभा निवडणुकीत उगाळले जातात. कुठे जातीचा, कुठे धर्माचा, मंदिरांचा वापर प्रचाराचा मुद्दा म्हणून केला जातो तर कुठे चक्क नाल्या बांधून देण्याचे आश्वासनही पुरेसे ठरते. इतके सगळे करूनही शेवटी काय तर एकाही पक्षाला किंवा सतरा पक्षांच्या आघाडीला साध्या बहुमताचा आकडा गाठता येत नाही. गेल्या वीस वर्षांपासून देशात खिचडी सरकारचा प्रयोग सुरू आहे. परस्परविरूद्घ दिशांना ओढणारे घोडे जुंपून रथ हाकलण्याचा हा प्रयत्न जितका हास्यास्पद आहे तितकाच या एकूण प्रक्रियेवरच्या विश्वासार्हतेलाही धोक्यात आणणारा आहे. यावेळीही काही वेगळे होण्याची शक्यता नाही. पूर्वी किमान डाळ,