Saturday, June 13, 2009

नवे शुद्र!

सामाजिक नयाय हा सधया परचलित असलेला परवलीचा शबद आहे. सगळे राजकारण याच शबदाभोवती फिरत असते. परतयेक राजकीय पकषाचे घोषणापतर सामाजिक नयायाचे आशवासन दिलयाखेरीज पूरणतवास जात नाही. जाती'या उतरंडीत पिचलेलया या समाजातील काही जातींचे कायमच शोषण झाले, तयांचे नयायय हकक कायमच नाकारलया गेले आणि तयामुळे इतर पुढारलेलया जातीं'या तुलनेत या जाती मागास राहिलया, ही बाब नाकारणयात अरथ नाही. या जातींना विकासाची समान संधी मिळायला हवी आणि तयासाठी कायदयात काही विशिषट तरतुदी करायला हवयात, ही बाबही समरथनीय आहे; परंतु तयाचवेळी एका ठिकाणचा खडडा बुजविताना दुस:या ठिकाणी खडडा तयार होणार नाही, याचीही दकषता घेतलया गेली पाहिजे. सामाजिक नयाया'या आंदोलनाचे आजचे सवरूप पाहता ही दकषता घेतली जात आहे असे महणणे थोडे धाडसाचेच ठरेल. खरेतर सामाजिक नयायाचा पाया सामानयांना नयाय हाच असायला हवा आणि या सामानय लोकांचा कोणतयाही जाती'या कुंपणात बंदिसत करून विचार होता कामा नये. पुढारलेलयां'या शोषण वयवसथेत भरडलया जाणारा सामानय माणूस परतयेक जातीत असतो. तयामुळे सामाजिक नयायाची संकलपना अधिक विसतृत होऊन ती सामानयांना नयाय अशी होणे अपेकषित आहे. तसे झाले नाही तर शोषक आणि शोषित यां'या केवळ भूमिका बदललया जातील, वयवसथा तीच कायम राहिल. शिकषणा'या कषेतराचा विचार केला तर आपलयाला दिसून येते की पूरवी शिकषणा'या हककाचा थेट संबंध जातीशी होता. उ'चवरणीय जातींनाचा शिकषणाचा अधिकार असायचा, तातपरयाने तयाच जातींना विकासाची संधी उपलबध वहायची. सुरूवातीला महातमा फुलयांनी या पकषपाती वयवसथेला सुरूंग लावणयाचा परयतन केला. तयांना काही परमाणात यश देखील आले; परंतु सगळयात महततवाचे महणजे तयांनी ठिणगी चेतवली. तयाच ठिणगीचा पुढे वडवानल झाला आणि शिकषणातील काही जातींची एकाधिकारशाही संपुषटात आली. महातमा फुलयां'या काळातील आवहान वेगळे होते आणि तयांनी तसेच तयां'या परंपरेतील लोकांनी ते तयां'या पदघतीने मोडीत काढणयाचा परयतन केला. आज आवहान वेगळे आहे. आज शिकषणाचा किंवा उ'चशिक्षणाचा अधिकार जाती'या आधारावर नाकारलया जात नाही. आता हा अधिकार आरथिक आधारावर निशचित होतो. पूरवी शुद्र हे संबोधन जातीगत होते, आता नवे शुद्र जनमाला येत आहेत आणि तयांचा संबंध तयां'या आरथिक परिसथितीशी आहे. खासगी अथवा सरकारी नोक:यांमधील, विविध कंपनयां'या उ'च पदांवरील जागांची संखया तुलनेत अतिशय कमी असते. पूरवी या जागांसाठी फारशी सपरधा नसायची कारण या जागांंवर पोहचणयासाठी लागणारी शैकषणिक पातरता परापत करणा:यांचे परमाणच कमी असायचे; परंतु आता शिकषणाची दारे सगळयांसाठी खुली असलयाने सपरधा वाढली आहे. पूरवी शिकषणापासून चार हात लांबच राहणा:या बहुजन समाजातील मुलेही आता या उ'चपदां'या सपरधेत आवहान उभी करीत आहेत. हे आव्हान तसे मोडीत काढणे शकय नाही, हे लकषात आलयावर आता उ'चशिकषणातील आणि परयायाने उ'चपदांवरील आपला अधिकार सुरकषित ठेवण्यासाठी समाजातील उ'चभू्र वरगाने नवी शककल लढविली आहे. सरकारलाच हाताशी धरून या वरगाने समांतर शिकषण वयवसथा खासगी शाळां'या माधयमातून उभी केली आहे. तयातूनच ठिकठिकाणी कॉनवहेंट वगैरेंचे पीक फोफावले आहे. ब:याच ठिकाणी निवासी वयवसथा असलेलया आणि शिकषणा'या अतयाधूनिक सुविधा असलेलया मोठ मोठया शाळा उभया केलया आहेत. डेहराडून, नाशिक, पुणे, लोणावळा, पाचगणी इथलया अशा शाळांचा एकूण आवाका पाहिला तर आपण भारतात आहोत की एखादया युरोपियन देशात असा परशन पडतो. एक ते तीन लाख परयंत वार्षिक शुलक आकारणा:या या शाळा महणजे शिकषणा'या बाजारपेठेतील चकचकीत मॉलसच महणायला हवयात. या मॉलसमधये सामानय गराहकांना परवेशच नसतो. 'यां'या खिशात भरपूर पैसा आहे, अशाच पालकांची मुले या शाळांमधये दाखल होतात. या शाळांमधील शिकषण आणि सरवसामानयांसाठी असलेलया सरकारी शाळांमधील शिकषणाची तुलनाच होऊ शकत नाही. सवाभाविकच जेवहा उ'चशिकषणासाठी सपरधेचा परशन निरमाण होतो तेवहा सरकारी शाळांमध्ये शिकलेली सरवसामानयांची मुले आपोआपच मागे पडतात. नुकतेच बारावीचे निकाल जाहीर झाले. या परीकषेतील गुणवंतां'या नावावरून थोडी नजर फिरवली तरी हा फरक आपलया सहज लकषात येईल. जवळपास ऐंशी टकके गुणवंत आरथिक परिसथिती अतिशय चांगली असलेलया घरचे आहेत. याचाच अरथ आता आरथिक आधारावर नवे शुदर आमही निरमाण करीत आहोत. जेवहा हा आधार जातीगत होता तेवहाही समाजातील ऐंशी टकके लोकांना शिकषणाचा अधिकार नवहता आणि आताही समाजातील ऐंशी टकके लोकांना उ'चशिकषण नाकारले जात आहे. पराथमिक शिकषण मातर सगळयांनाच उपलबध आहे, कारण पराथमिक शिकषणाची सोय सरकारतरफे केली जाते. तयामुळे या शिकषणासाठी फारसा खरच येत नाही. दहावी-बारावी परयंत मुले सहज शिकू शकतात; त्यापुढे मातर पैसेवालयांचे अघोषित आरकषण सुरू होते. एरवी सामाजिक नयाया'या नावाने कंठशोष करणा:या राजकीय नेतयांचाही याला मोठा हातभार आहे. तयां'या महाविदयालयातच भरपूर देणगी दिलयाशिवाय परवेश मिळत नाही. त्याचवेळी इतर खासगी शाळां'या तुलनेत सरकारी शाळांमधये मिळत असलेले पराथमिक आणि माधयमिक शिकषण इतके सुमार दरजाचे असते की या शाळांमधून दहावी-बारावी झालेली मुले बौद्घिकदृषट्याही खूप मागे पडतात. याचा परिणाम हा होतो की या देशाचे कोट्यवधीचे मनुष्यबळ केवळ मजुरी किंवा इतर निम्न दर्जाची कामे करण्यात वाया जाते. बियाणे उततम दरजाचे असूनही केवळ पडिक किंवा बंजर जमिनीत पडल्यामुळे न अंकुरताच कोमेजून जाते. ही परिसथिती लक्षात घेऊन सरकारने आता शिकषणा'या कषेतरातील पैशाचा धुडगूस ताबडतोब थांबविणे गरजेचे आहे. त्यासोबतच इतर कुठलयाही खासगी शाळां'या तुलनेत त्याच दरजाचे शिकषण आणि इतर सुविधा सरकारी शाळांमधयेही उपलबध करून देणे सरकारची जबाबदारी आहे. सगळ्यांना पराथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यावरच सरकारची जबाबदारी संपत नाही तर हे शिकषण दरजेदार आणि आधुनिक काळाशी सुसंगत कसे असेल, याचीही काळजी सरकारने घयायला हवी. उ'चशिकषणासाठी एक पैसाही या विद्याथ्र्याला सवत:'या खिशातून खर्च करावा लागणार नाही, ही काळजी देखील सरकारने घ्यावी. तसे झाले नाही तर उ'चशिक्षण ही केवळ पैसेवाल्यांची मत्ते*दारी होईल आणि शैक्षणिक विकासातली दरी पूर्वीसारखीच कायम राहिल. शुद्र पूर्वीही होते, शुद्र आताही आहेत; फरक पडला तो एवढाच की पूर्वी शुद्रां'या काही जाती होत्या आता सर्वच जातीत शुद्र जन्माला येत आहेत. कारण गरीबी सर्वच जातीत आहे आणि नव्या व्यवस्थेत गरीबी हा शुद्र असण्याचा मुख्य आधार होऊ पाहत आहे.

1 comment:

 1. good morning sir,
  this is anil dhul from khandala tq telhara dt akola
  i like ur sampadkiy kekh
  thanks  anil r dhul
  9860791271

  ReplyDelete